ज्योतिरादित्यही हाती कमळ धरणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |


महाराष्ट्रातील राजकारणाने सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे. मात्र त्यामुळे केंद्रातील हालचालींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे मध्यप्रदेशातील नावाजलेले नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील परिचय बदलला. या बदललेल्या परिचय पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आणि अनेक प्रश्नांना तोंड फुटले. ट्विटरवरील परिचय बदलण्यामागे काय कारण असावे? हा त्यातील एक महत्वाचा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपला आधीचा परिचय बदलून 'Public servant, cricket enthusiast' असा केला आहे. त्यामुळे आता ते काँग्रेस पक्ष सोडणार की काय अशा शंका राजकीय वर्तुळातून निर्माण व्हायला सुरुवात झाली. शिवाय याचा संबंध ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑक्टोबरमध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता याच्याशी देखील लावला जात आहे. त्याचबरोबर कमलनाथ सरकारविषयी त्यांची असलेली नाराजी बऱ्याच लोकांच्या नजरेतून सुटलेली नाही.

त्यामुळे आता या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या खास वर्तुळातील समजले जाणारे ज्योतिरादित्य सिंध्या यांच्या मनात नेमके काय चालू आहे याचा खुलासा ते कधी करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

@@AUTHORINFO_V1@@