ज्यांनी 'राम' नाकारला ते कपिल सिब्बल शिवसेनेच वकील झाले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |

 

संजय राऊतांनी 'सामना'तून कपिल सिब्बलांवर ऐकेकाळी टीका केली होती : दानवे


मुंबई : ज्या वकीलाने राम मंदिर खटल्यात राम नाकारला, त्याने रामभक्तांना गुंड ठरवले, तेच आज शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत. त्यांना स्वतःचा वकीलही मिळालेला नाही, अशी खरमरीत टीका भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केली आहे. भाजपच्या मुंबई कार्यालयात दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर पक्षातर्फे अधिकृतरित्या भाष्य केले. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांचाच 'व्हीप' अधिकृतरित्या चालणार आहे, असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

शिवसेनेचा समचार घेताना त्याने नेते संजय राऊत यांना जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांना सत्तेत येण्यापूर्वीच वेड लागले आहे, अशी रावसाहेब दानवे यांची टीका केला आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार आहेत; अजित पवारांना व्हीप काढण्याचा अधिकार, आहे, अशी माहीती दानवेंनी दिली आहे. तसेच राज्यपालांनी घटनात्मक चौकटीचे पालन केले आहे, कोठेही नैतिकतेची पायमल्ली नाही. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी आमदारांच्या समर्थनाचे पत्र देऊन राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात अस्थिर वातावरण तयार झाले होते, शेतकऱ्यांना न्यायहक्क देण्यासाठी राज्याला स्थिर सरकार गरजेचे होते, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे भाजपने जाहीर केले आहे.



@@AUTHORINFO_V1@@