अजित पवारांचा 'व्हीप' राष्ट्रवादी आमदारांना पाळावाच लागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |


महाविकासआघाडीचे पत्र अवैध : अजित पवार


मुंबई : अजित पवार तांत्रिकदृष्ट्या अजूनही राष्ट्रवादीतच आहेत. ते विधीमंडळ गटनेते पदावरही आहेत. काँग्रेसकडे त्यांचा गटनेता नाही. त्यामुळे अजित पवार यांची नियुक्तीच अजूनही अधिकृत आहे. त्यांनी जारी केलेला व्हीप हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायद्याच्या दृष्टीने मान्य करावा लागेल, असे स्पष्टीकरण भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिले आहे. तसेच महाविकासआघाडी म्हणजे 'पागलपंती', आहे. असेही ते म्हणाले.

 

"आज तीन पक्षाने जे पत्र राज्यपालांना दिले त्यावर गटनेता म्हणून अधिकृत कोणाची सही नाही. कायदा सांगतो की सत्ता स्थापनेचा दावा जर कोणाला करायचा असेल तर नेता निवड करावी लागते. मुख्यमंत्री कोण हे सांगावे लागते ते तिन्ही पक्ष सांगू शकले नाही.", अशी प्रतिक्रीया आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या दाव्याबद्दल केली आहे.

 

"राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र, हा सत्ता स्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणारे पत्र आहे. सकाळी आम्हाला वेडे म्हणणारे आता एक चित्रपट आला आहे. 'पागलपंती' त्यांची ही 'पगलपंती' आहे. पत्र दिलं नेतृत्वविना, अजूनही काँग्रेसने आपला विधिमंडळातील नेता ठरवलेला नाही. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो मी वारंवार बोलतो आहे आणि आज न्यायालयातही मुद्दा आला, की अजित पवार यांना अजूनही गटनेता पदावरून कायदेशीर प्रक्रिया करुन काढलेलं नाही.", असे ते म्हणाले.

 

अजित पवारांचा 'व्हिप' चालणारच !

अजित पवारांचा 'व्हिप' अजूनही चालणारच आहे. आज दिलेल्या पत्रावर अजित पवार यांची सही नाही. तसेच ज्यांनी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे किंवा गटनेते म्हणून ज्यांना अधिकार दिले त्याला वैधता नाही. पक्षातील बंड थांबवण्याचा हा त्यांचा प्रयन्त आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्यांची ही पागलपंती सुरू आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दैनिक 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@