लंडनमधील काश्मिरी तरूण जमवतायेत सीमावर्ती भागासाठी निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |




लंडन : परदेशात स्थायिक झालेले जम्मूचे परदेशी भारतीय पुन्हा एकदा आपल्या मातीसाठी काहीतरी करण्याचा दृढनिश्चय करताना दिसून आले. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील मुलांसाठी 'आंतरराष्ट्रीय डोगरा सोसायटी'ने पुढाकार घेतला आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक डोगरा तरुण सीमा-शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक गरजेसाठी निधी गोळा करत आहेत. यासाठी लंडनच्या हॉय मार्केटमध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अली फजल याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चॅरिटी शोचा उद्देश जगाच्या कानाकोपऱ्यातून मदत गोळा करणे आणि सीमाभागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी सकाळी तिकिटांचे जोरदार बुकिंग आधीच झाले आहे.


आंतरराष्ट्रीय डोगरा सोसायटीचे संस्थापक आणि संचालक ललित शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की
, "आमचा समाज जम्मू प्रशासनाशी सतत संपर्कात असतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार गोळा केलेला निधी सीमाभागातील मुलांसाठी वापरला जाईल. सोसायटीचे संचालक जमा झालेला निधी दान करण्यासाठी डिसेंबरमध्ये जम्मू येथे येणार आहेत."


आंतरराष्ट्रीय डोगरा सोसायटीचे सदस्य जम्मूची लोकसंस्कृती
, खाद्यसंस्कृती तसेच पर्यटनासाठी काम करीत आहेत. जम्मू विभागातील डोगरी भाषा संघटनेचे सदस्य जगाच्या पाठीवर डोगरीचा गोडवा पसरवत आहेत. देश आणि जगात स्थायिक झालेल्या डोगरा समाजाला एकत्रित करून त्यांची ओळख टिकवून ठेवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@