भाजपची रणनीती तयार : फडणवीसांचा अभिनंदन प्रस्ताव सादर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |




मुंबई : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार विश्वासदर्शक ठराव नक्कीच जिंकणार," असा विश्वास रविवारी भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.




 

भाजपच्या सर्व आमदारांची विशेष बैठक रविवारी दादर येथील वसंतस्मृती येथे पार पडली. या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती शेलार यांनी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांना दिली.




 

यावेळी ते म्हणाले, "येत्या शनिवारी दि. ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्याबाबतची रणनीती आखण्यात आली असून आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होऊ, असा दावा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.




 

राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थिर आणि सक्षम सरकार देण्यात येईल. राज्याच्या विकासाला गती देण्यात येणार आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. फडणवीस-पवार यांचे सरकार आल्याने राज्यातील जनतेत आनंदाचे वातावरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





 

आमचे आमदार कुठेही जाणार नाही

"भाजपच्या आमदारांना कुठेही हलविण्यात येणार नाही. त्यांना कुठेही डांबून ठेवण्यात येणार नाही. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास आहे. त्यांची पक्षावर निष्ठा आहे. त्यामुळे त्यांना कुठेही हलविण्याची गरज नाही. आमदारांवर विश्वास ठेवू न शकणार्‍या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली, हे दुर्देव आहे. राज्यात ऑपरेशन लोटस नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार सुरू आहे," असे यावेळी शेलार म्हणाले.


 

अजित पवारच व्हिप बजावतील

"अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आहेत. त्यामुळे त्यांनाच व्हिप बजावण्याचा अधिकार आहे, असा दावा रविवारी शेलार यांनी केला. काँग्रेसबरोबर युती ही गोराबाजार आहे, तर आमची युती ही काळाबाजार कशी?"असा सवाल करतानाच शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

 


’रामप्रहर’ सेनेला काय कळणार?

"मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी रामप्रहरीच घेतली. आम्ही संघ स्वयंसेवक आहोत. प्रातःशाखेत आम्ही सकाळी ६ वाजता पोहोचणारे आहोत. शिवसेनेने राम सोडला, त्यांना रामप्रहर काय असतो हे काय कळणार?," असा सवाल शेलार यांनी संजय राऊतांना केला. विजयाचा जयघोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मुंबईतील वसंतस्मृती येथे भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्याबद्दल सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले. तसेच यावेळी भाजपसोबतच इतर काही अपक्षांनीही भाजपला आपला पाठिंबा दिला.

 

अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करणार्‍या भाजपला आता बहुमताच्या चाचणीत विजय मिळवायचा आहे. त्यामुळे रविवारी झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपच्या सर्व आमदारांसह अपक्षांनी पाठिंबा दर्शवत स्थिर सरकार आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी आमदारांनी ‘महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो? देवेंद्र फडणवीस जैसा हो,’ अशा घोषणा देत रविवारी वसंतस्मृती सभागृह दणाणून सोडले.

@@AUTHORINFO_V1@@