आम्ही सकाळी सहा वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत ! संजय राऊतांना टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |


'रामप्रहर' काय असतो ते 'शिवसेने'ला काय कळणार : आशिष शेलार


मुंबई मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी रामप्रहरावेळीच घेतली. आम्ही संघ स्वयंसेवक आहोत प्रातःशाखेत आम्ही सकाळी ६ वाजता पोहोचणारे आहोत. शिवसेनेने राम सोडला त्यांना रामप्रहर काय असतो हे काय कळणार ? , असा टोला भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्याचा समाचार घेताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

 

राज्यातील सत्तास्थापनेबद्दल संजय राऊत यांनी आणीबाणीशी तुनला केल्याचा समाचारही त्यांनी घेतला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर आम्ही राज्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली. आम्ही केलेल्या दाव्याला काळाबाजार म्हणणाऱ्या शरद पवारांनी सोनियांशी गोरा-बाजार केला का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. जमेल त्या घाणेरड्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही संजय राऊत नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबद्दल ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा येईल आम्ही पाहू, पण ३० तारखेपर्यंत आम्हाला विश्वासदर्शक ठराव जिंकायला वेळ दिला आहे. किमान १७० संख्याबळाच्या जोरावर आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ३० तारखेला बहुमत सिद्ध करुन महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, असे आशिष शेलार म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@