विद्यार्थ्यांची ‘रोम’ हर्षक झेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019   
Total Views |




भारतात वाहतूक समस्या असणे आणि त्यातून वाढणारे अपघाताचे प्रमाण हे निश्चितच चिंताजनक आहे. या मागे अनेकविध कारणे असली तरी, त्यातले प्रमुख कारण म्हणजे वाहतूक नियमांसंबंधी असणारी अजाणता. याबाबत शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आदींच्या माध्यमातून विविधप्रकारे जनजागृती केली जाते. मात्र, तरीदेखील वाहतूकीसंबंधी फारशी सुधारणा होताना दिसत नाही.



खंडप्राय देश असलेल्या भारतात अनेकविध समस्या असल्याची चर्चा देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर चर्चिली जाते
. त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे वाहतूकीची. भारतात वाहतूक समस्या असणे आणि त्यातून वाढणारे अपघाताचे प्रमाण हे निश्चितच चिंताजनक आहे. या मागे अनेकविध कारणे असली तरी, त्यातले प्रमुख कारण म्हणजे वाहतूक नियमांसंबंधी असणारी अजाणता. याबाबत शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आदींच्या माध्यमातून विविधप्रकारे जनजागृती केली जाते. मात्र, तरीदेखील वाहतूकीसंबंधी फारशी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळेच नाशिकमधील इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावर मार्ग काढला आहे आणि त्याबाबतच्या आपल्या संकल्पनेचे सादरीकरण हे विद्यार्थी आता रोम येथे करणार आहेत. त्यामुळे ही विद्यार्थ्यांची ‘रोम’हर्षक झेप आहे, असे म्हणावेसे वाटते.



सकारात्मकता आणि प्रबोधनाद्वारे समाजात परिवर्तन करण्यात योगदान देणार्
‍या नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘माय बायसिकल लायसन्स ’ या अभिनव प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. समाजात परिवर्तन, बदल करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची, संशोधनाची माहिती जगासमोर यावी, या उद्देशाने ‘डिझाईन फॉर चेंज’ (डीएफसी) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे दरवर्षी वर्ल्ड समिट व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाची समिट ही इटलीतील रोममधील व्हॅटिकन सिटीमध्ये २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या समिटमध्ये इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थी स्कूलचे प्रमुख सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माय बायसिकल लायसन्स’ या अभिनव प्रकल्पाचे सादरीकरण केले जाणार आहे.



नाशिकसह भारताच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब असून या समिटमध्ये सहभागी होणार्
या जगभरातील ८० देशांचे विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. डिझाईन संस्थेचे संस्थापक किरण सेटी यांच्या पुढाकाराने दरवर्षी ही समिट होत असते. डीएफसी या संस्थेतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा व समिट घेतल्या जातात. समाजात परिवर्तन घडवू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याची संधी असते. इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘माय बायसिकल लायसन्स’ या अभिनव प्रकल्पामुळे सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने आमूलाग्र बदल होऊ शकतो. दुचाकीप्रमाणेच सायकलचालकांनाही लायसन्स अनिवार्य करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी हे लायसन्स उपयोगी ठरू शकेल. जगभरात सध्या सायकल चालविण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक देशांत तर सायकलींसाठी स्वतंत्र रस्तेही तयार होत आहे.



इस्पॅलियर स्कूलच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेला
‘माय बायसिकल लायसन्स’ हा प्रकल्प बदल घडविण्यासाठी दिशादर्शक असाच आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भरत कळसकर, माजी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, ईएसडीएसच्या प्राजक्ता सोमाणी, स्कूलचे प्रमुख सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी http://www.mybicyclelicense.com हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या वेबसाईटवर नोंदणी केल्यावर एक प्रश्नावली योग्य उत्तरे देऊन पूर्ण केल्यावर लायसन्स प्राप्त होते. डीएफसी या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत जागतिक स्तरावरील २२०० शाळांनी आपले प्रकल्प (स्टोरी) पाठविले होते. यात इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला ‘लाईफ सेव्हर ऑफ युअर फॅमिली’ हा प्रकल्प सादर केला. या विद्यार्थ्यांनी शहरातील इतर शाळांतील सुमारे ८ ते ९ हजार विद्यार्थ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण दिले. तसेच हृदयविकाराचा प्रसंग उद्भवल्यास घाबरून न जाता तत्काळ कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. ‘बी अ लाईफ सेव्हर’ या प्रकल्पाने परिवर्तन घडवण्यात मोलाचे योगदान दिल्याने या स्टोरीची निवड जागतिक स्तरावर करण्यात आली. लाँग लिस्टिंग श्रेणीत या प्रकल्पाची निवड झाली.



लहान वयातच वाहन कसे चालवावे
, याचे शास्त्रीय ज्ञान सायकल परवाना प्राप्तीच्या माध्यमातून प्राप्त व्हावे, यासाठी हा प्रकल्प बनविण्यात आला आहे. त्यामुळे उद्याचे भावी नागरिक हे लहान वयापासूनच वाहतूक नियमांसंबंधी जागरूक होतील. त्यामुळे भविष्यात तरी भारतातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल, अशी धारणा हा प्रकल्प मांडताना विद्यार्थ्यांची आहे.

@@AUTHORINFO_V1@@