काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्याची विशेष पथके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |





नवी दिल्ली
: काश्मीरमधील दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने तिन्ही दलांचे विशेष सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराची, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.


या मोहिमेमध्ये सैन्याच्या पॅरा-स्पेशल फोर्स
, नौदलाचे मरीन कमांडो म्हणजेच मार्कोस आणि वायुसेनेच्या गरुड स्पेशल फोर्स या तिन्ही सैन्यांची सर्वोत्तम यनिट तैनात केली जाणार आहेत. तीनही दलाचे विशेष सैन्य दहशतवाद्यांविरूद्ध संयुक्तपणे मोहीम राबवतील. संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठानी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने गठित केलेल्या नवीन सशस्त्र बल विशेष ऑपरेशन विभाग (एएफएसओडी) अंतर्गत या तुकड्या तैनात केल्या आहेत.


या तिन्ही दलांची एकत्रित विशेष पथके आधीपासूनच आर्मी पॅरा (विशेष दल) म्हणून कार्यरत आहेत. श्रीनगरजवळ अतिरेक्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात त्यांना तैनात करण्यात आले आहे. तथापि
, नौदलाच्या मार्कोस कमांड आणि हवाई दलाच्या गरुड कमांडची एक छोटी टीम काश्मीर खोऱ्यात कार्यरत आहे. परंतु प्रथमच तिन्ही दलांची एकत्रित टीम तैनात करण्यात येत आहे. मार्कोस व गरुड लवकरच दहशतवाद विरोधी कारवाईत तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे वुलर लेक भागात नेव्हल मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत
, तर लोलाब आणि हाजिन याठिकाणी हवाई दलाची 'गरुड' तैनात करण्यात आली आहे. वायुसेनेच्या विशेष दलाने यापूर्वीच काश्मीर खोऱ्यात अनेक यशस्वी ऑपरेशन केले आहेत. 'ऑपरेशन ऐश हाजिन' अंतर्गत त्यांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. जेपी निराला यांना यासाठी मरणोत्तर अशोक चक्रानेही सन्मानित करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@