अजित पवारांनी कापून टाकले परतीचे दोर : 'राष्ट्रवादी'ला ट्विटद्वारे दिले संकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |




मुंबई : अजित पवारांची नेमकी भूमीका काय, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी केल्यानंतर अजित पवार काय निर्णय घेतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. मात्र, अजित पवारांनी स्थिर सरकारच्या पारड्यात आपला निर्णय दिला असून घेतलेल्या भूमीकेवर ते ठाम असल्याचे त्यांनी केलेल्या ट्विटमधून दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद दिले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबद्दलची शक्यता आता धूसर झाली आहे.

 

अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्या पाठीशी अद्याप कायम असल्याची शक्यता अजूनही नाकाराता येत नाही. अजित पवारांनी भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना आपल्या ट्विटद्वारे धन्यवाद दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, निर्मला सितारामण, स्मृती इराणी, राजनाथ सिंह, पीयुष गोयल, सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्र सिंह शेखावत, खासदार गिरीश बापट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष जे.पी.नड्डा आदी नेत्यांना धन्यवाद दिले आहे.












@@AUTHORINFO_V1@@