अजित पवारांनी सादर केले आमदारांच्या पाठींब्याचे पत्र : गिरीश महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |


मुंबई : शरद पवारांनी जरी अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आमच्या पक्षाचा अधिकृत निर्णय नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही अजित पवार यांनी आमदारांच्या पाठींब्याचे पत्र दिल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा मोठा गट हा अजित पवारांसोबत असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा गट हा पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा सर्वात मोठे खिंडार पडल्यास शरद पवारांचीही राज्याच्या राजकारणातील पकड सुटणार का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. गिरीश महाजन यांनी शिवसेनेचा आणि संजय राऊतांचाही समाचार घेतला आहे.
 

"राज्याच्या जनतेने कौल देऊनही युतीधर्म न पाळल्याने भाजपला राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करावे लागले. कुठल्याही प्रकारची चर्चा न करता केवळ पत्रकार परिषदांमधून आपल्या मित्रपक्षांवर टीका करण्यात राऊतांना धन्यता वाटत होती, त्यामुळे याचाच परिणाम सध्या राज्याच्या राजकारणात दिसत आहेत," असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@