उद्धव ठाकरेंसमोर पक्ष बांधून ठेवण्याचे आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |



मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच भाजप यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेनेला आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी प्रचंड जोर लावावा लागणार आहे. २३ नोव्हेंबरचा दिवस ऐतिहासिक ठरला, राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शपथविधी पार पडला. ही बातमी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या नेत्यांच्या राजकारणाला सुरूंग लावणारी ठरली.

 

मुख्यमंत्रीपदावर अडून बसलेल्या शिवसेनेसमोर आता पक्षातील बंडाळी थोपवण्याचे एक मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. त्यामुळे समसमान सत्तेतील वाटेकरी होण्याचा दावा करणाऱ्या संजय राऊत यांना आता स्वतःचा पक्ष बंडखोरीपासून वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा आमदारांचा गट भाजपसोबत गेला असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांवर शरद पवार यांनी अद्याप कुठलीही थेट कारवाई केलेली नाही. त्यामुळे राजकारणाचा फास उद्धव ठाकरे यांच्याभोवती आवळला जात आहे हे स्पष्ट आहे.

 

संजय राऊत यांनी आपल्या मुलाखतीत वारंवार सांगितले होते कि, 'शरद पवारांचे राजकारण समजण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील.' मात्र, पवारांचे हेच राजकारण राऊतांनाही समजलेले नाही. राष्ट्रवादीच्या ३० आमदारांचा भाजपला पाठींबा असल्याची सुत्रांची माहिती आहे. शरद पवार शनिवारी दुपारी आमदारांची बैठक घेणार आहेत. मात्र, सत्तास्थापनेचा दावा करताना राष्ट्रवादीचे आमदार नेमके कुणाला मतदान करणार हे येणारी वेळच सांगणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@