भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय अजित पवारांचा राष्ट्रवादीशी त्याचा संबंध नाही : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |



मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक असल्याचे मत असल्याचे मत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी शनिवारी सकाळी शपथ घेतली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी गेले आठ दिवस चर्चा आणि बैठका सुरू होत्या. मात्र, या सगळ्या राजकीय नाट्यात भाजपने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले आहे.

 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. "राज्याच्या जनतेला तीन पक्षांच्या सरकारापेक्षा एक स्थिर सरकार मिळणे केव्हाही चांगलेच", अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली आहे. संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.




 

@@AUTHORINFO_V1@@