फडणवीसांनी 'राष्ट्रवादी' फोडली ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |
 


मुंबई : राज्याच्या राजकारणातील मोठ्या राजकीय भूकंपात देवेंद्र फडणवीस यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावत सत्तास्थापेनसाठी लागणाऱ्या संख्याबळापर्यंत पोहोचण्यात त्यांनी यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट भाजपच्या गळाला लावण्यात भाजपला यश मिळाले आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेही अजित पवारांसोबत भाजपला पाठींबा देणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालपासून धनंजय मुंडे यांचा मोबाईल स्वीच ऑफ येत असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीतील एक मोठा नाराज गट हा भाजपला पाठींबा देणार असल्यानेच अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाल्याचे बोलले जात आहे.




 

शरद पवार मात्र, या सर्व घडामोडींपासून अनभिज्ञ आहेत. तसे स्पष्ट ट्विटच त्यांनी करत त्यांनी पक्षाची प्रतिक्रीया त्यांनी दिली. या साऱ्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे खंत व्यक्त केली आहे. 'पार्टी अॅड फॅमिली स्पिट', असे स्टेटस यांनी टाकले आहे. त्यानंतर ज्यांना मी प्रेम दिलं, त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहा त्यांनी आम्हाला मोबदल्यात काय दिलं, असे स्टेटस त्यांनी शेअर केलं आहे.




@@AUTHORINFO_V1@@