मुख्यमंत्रीपदाचा हट्ट करणाऱ्या शिवसेनेच्या नशिबी विरोधीपक्षनेतेपदही नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |




मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट करणाऱ्या शिवसेनेने युतीधर्म तोडत सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली होती. मात्र, राज्यात आता शिवसेनेच्या वाटेला राज्याचे विरोधीपक्षनेतेपदही मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसने शिवसेनेला विरोधीपक्षनेतेपद मिळू नये, अशी भूमिका आता घेतली आहे. त्यामुळे एकेकाळी सत्तेत समसमान वाटा मिळायला हवा, अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या नशीबी राज्याच्या विरोधीपक्षनेतेपदासाठीही झगडावे लागणार असल्याचे सध्याचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र आहे.

 

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्याच्या राजकारणातील हालचाली वेग घेऊ लागल्या. काँग्रेस आमदारही पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. सत्तास्थापनेसाठी प्रदीर्घ काळ चर्चा करूनही काहीच हाती न लागल्याने काँग्रेसमधील एक गट पक्षनेतृत्वावर नाराज आहेत.



@@AUTHORINFO_V1@@