संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |


 
 

मुंबई : राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपतर्फे अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. "राज्याच्या जनतेने भाजपला कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने त्याचा अनादर केला. मात्र, संजय राऊत यांनी ज्याप्रकारे भाजप आणि नेत्यांवर निकालाच्या पहिल्या दिवसांपासून हल्लाबोल केला त्या दिवसापासून युतीमध्ये दूही निर्माण झाली. शिवसेनेची वाट लावण्याचे काम संजय राऊत यांनी केले. त्यामुळे भाजपने जनतेच्या कौलानुसार, भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन केले आहे.", अशी प्रतिक्रीया चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत वसंतस्मृती येथे रविवारी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देणार असल्याचेही सांगितले आहे. नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबर देण्यात आली आहे. राज्याचा राजकारणातील सर्वात मोठा भूकंप, असे या निर्णयाकडे पाहिले जात आहे.



@@AUTHORINFO_V1@@