शिवसेनेला योग्य वेळी उत्तर देईन : भाजप नेते रविशंकर प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : शिवसेनेने युतीत राहून भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर ज्या प्रकारची टीका टीपण्णी केली होती. हे आम्ही वेळोवेळी पाहिले आहे. शिवसेनेचे नेते आणि त्यांचे मुखपत्र युतीत राहून भाजपच्या केंद्रातील नेत्यांवर आणि सरकारवर टीका करत राहीले, आम्ही हे सर्व सहन केले. सत्तेतील समसमान वाटपासाठी ज्या प्रकारे काँग्रेसला जवळ करून नवी राजकीय समीकरणे जुळवू पाहत होती, त्यावर आम्ही बघ्याची भूमीका घेतली. आमचा मित्रपक्ष सत्तेसाठी कुठपर्यंत जाऊ शकतो, हे आम्हाला पाहायचे होते. त्यावर योग्यवेळी बोलू, असे मत भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात भाजपने सत्तास्थापन केल्यानंतर नवी दिल्ली भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रविशंकर प्रसाद म्हणाले, "राज्याच्या जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी अधिकृतपणे पाठींबा दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याला स्थिर सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शिवसेनेने जे केले ते लोकशाहीला धरून होते का ? असा सवालही त्यांनी विचारला."


 

@@AUTHORINFO_V1@@