कोण आहे 'मोदी जी की बेटी' ?

    22-Nov-2019
Total Views |



मुंबई: गोव्यात सुरू असलेल्या नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनएफडीसी) च्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये एका चित्रपटाच्या शिर्षकानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या चित्रपटाचं आहे 'मोदी जी की बेटी'! चित्रपटाची कथा आणि कलाकारांबाबत माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या चित्रपटाचं काम सुरू असून, हा एक विनोदी अॅक्शनपट असणार आहे. याद्वारे जाहिरात क्षेत्रात कार्यरत असणारे फिल्ममेकर एडी सिंह या चित्रपटाच्या माध्यमातून सिने विश्वात पदार्पण करणार आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत या फेस्टिव्हलच्या दरम्यान सिंह यांनी गप्पा मारल्या. 'त्यांना आणि सिने क्षेत्रातल्या काही महान लोकांना भेटून चांगलं वाटलं. यापैकी अनेकांसोबत मला काम करण्याची इच्छा आहे. मी माझा सिनेमा 'मोदी जी की बेटी' बद्दल सर्वांना सांगू शकलो, हे मी माझं भाग्य समजतो.' असं एडी सिंह यावेळी म्हणाले.