उल्हासनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई आशान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |



उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या पार पडलेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई आशान, तर रिपाइंचे भगवान भालेराव विजयी झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपाइं व भारिप बहुजन महासंघाच्या नगरसेवकांनी समर्थन दिले. भाजपचे नऊ, तर रासपच्या एक नगरसेविका शिवसेनेला मिळाल्याने भाजप-साई पक्षाला पराभव पत्करावा लागला.

शुक्रवारी उल्हासनगर महानगरपालिका सभागृह पीठासीन अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर व उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पार पडली. भाजप- साई पक्षातर्फे महापौरपदासाठी जीवन ईदनानी व शिवसेना- रिपाइंकडून लिलाबाई आशान उमेदवार होत्या. जीवन ईदनानी यांना ३५ मते, तर लिलाबाई आशान यांना ४३ मते मिळाली. जीवन ईदनांनी यांना आठ मतांनी पराभव पत्करावा लागला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत रिपाइंचे भगवान भालेराव यांनी शिवसेनेचे विजय पाटील यांचा दहा मतांनी पराभव केला. शिवसेनेला राष्ट्रवादी, काँग्रेस, व भारिपच्या नगरसेवकांनी समर्थन केले होते. भाजपचे नऊ व रासपच्या एक नगरसेविका यांनी भाजपसोबत दगाबाजी करत शिवसेनेला महापौर व उपमहापौर निवडणुकीत मतदान केल्याने भाजप साई पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले.


व्हिप झुगारणार्‍या नगरसेवकांवर कारवाई : चव्हाण

टीम ओमी कलानी’सोबत भाजपने फक्त महानगरपालिका सत्तेविषयी बोलणी केली होती. विधानसभेसाठी कोणतीही औपचारिक बोलणी झाली नव्हती. भाजपने यापूर्वी उल्हासनगर महानगरपालिका सत्तेत साई व टीओके यांनी समान वाटा दिला होता. निवडणुकीपूर्वी भाजप व साई पक्षाने आपल्या नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रियेविषयी ‘व्हीप’ जारी केला होता. परंतु, दहा नगरसेवकांनी पक्षाच्या ‘व्हीप’च्या विरोधात मतदान करून पक्षाची गद्दारी केली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार,” असे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@