शिवसेनेला रोखण्यासाठी राज ठाकरे सरसावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |


नाशिक : राज्यात सत्तासमीकरणे जुळवत मुंबई महापौरपदावरही मोहोर उठवणाऱ्या शिवसेनेला नाशिकमध्ये रोखण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. आमदार गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेवर भाजपचा महापौर निवडून आणला आहे. यात मनसेच्या पाच नगरसेवकांचा पाठींबा मिळाल्याने भाजपसाठी नाशिक महापालिका मिळवणे सोपे झाले. दरम्यान, कॉंग्रेसने 'व्हीप' जारी करत शिवसेनेला मतदान करण्याचे सांगितल्यानंतरही भाजपला त्यांचा पाठींबा मिळवण्यास यश आले. त्यामुळे भाजपचे सतीश कुलकर्णी हे सोळावे महापौर ठरले आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार,
'व्हीप' जाहीर करण्यात आला. शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या पालिका सर्वसाधारण सभेत महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी आणि उपमहापौरपदासाठी भीकुबाई बागुला यांना मतदान करण्याचे आदेश मनसे नगरसेविका नंदिनी बोडके यांच्या सहीनुसार देण्यात आले होते. सत्तास्थापनेच्या वाटाघाटीत शुक्रवारी अनेक महापालिकेचे महापौरांची निवड झाली. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत मनसेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या पक्षात आपले मत नोंदवले. तसेच, राज्यात सत्तास्थापनेसाठी चालू असलेला 'महाविकासआघाडी'चा प्रयोग नाशिकमध्ये मात्र फसला. तसेच, भाजपच्या दहाही नगरसेवकांनी बंडखोरी मागे घेत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला.


राज्यामध्ये होत असलेल्या
'महाविकासाआघाडी' प्रमाणे नसिकमध्येसुद्धा शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर निवडून येतो का? याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवाय, महाविकासआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला होता आणि महाविकासआघाडीला सुरुंग लागला. त्यामुळे आता नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@