'महाविकासआघाडी'च्या बैठकीत प्रथमच उद्धव ठाकरेंची हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |




मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीत बैठका झाल्यानंतर मुंबईतील नेहरू सेंटर येथे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव यांच्यासह संजय राऊत, मिलींद नार्वेकर आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, नसीम खान, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत.

 

दरम्यान, या बैठकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींब्याचे पत्र देणार असल्याची माहिती आहे. या पत्राच्या आधारे शिवसेना राज्यात सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याच बैठकीत कॉंग्रेसचा विधीमंडळनेताही ठरवला जाणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मालाड येथील ललित या पंचतारांकिती हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे या चर्चेत अंतिम निर्णय झाल्यानंतर सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@