आरोग्य सुविधांसाठी जम्मू काश्मीरला ८३६.६४ कोटींचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |




श्रीनगर : केंद्रशासित प्रदेश घोषित झाल्यापासून जम्मू आणि काश्मीरच्या विकासासाठी केंद्र सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. आज केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने आज जम्मू काश्मीरमधील आरोग्य सुविधांकरिता आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. उपराज्यपालांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने ८३६.६४ कोटी रुपयांचे पॅकेज दिले.


पंतप्रधान विकास कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या या सहाय्य रकमेद्वारे केंद्र जम्मूकाश्मीरमधील आरोग्य प्रकल्प पूर्ण करेल
, असे सांगितले. सरकारने या योजनेंतर्गत ११४ आरोग्य प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यापैकी ४८ कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पांमध्ये राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि नवीन रुग्णालयांचा समावेश आहे.

@@AUTHORINFO_V1@@