भारतीय लष्करी अधिकारी आयएसआयच्या निशाण्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : पाकिस्तानी संघटना आयएसआय सोशल मीडियावर लष्करी अधिकाऱ्यांची गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी लक्ष्य करत आहे ,अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रकरणानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेमार्फत काही लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या परवानगीशिवाय काही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. या प्रकरणानंतर भारतीय लष्कराने अ‍ॅडव्हायझरी जारी करून याबाबत भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना आपल्या फोनमध्ये काही सेटिंग करणे अनिवार्य केले.


भारतीय लष्कराच्या ११ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आर्मी अ‍ॅडव्हायझरीनुसार
, “लष्कराच्या एका व्यक्तीला +९२३०३३२५६९३०७ यानंबरवरून पाकिस्तानी संशयिताने व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले असल्याचे एका प्रकरणात समोर आले. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया चॅट अप्लिकेशनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संघटना लष्कराच्या जवानांना लक्ष्य करीत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांनाही यापूर्वी लक्ष्य केले गेले होते हे स्पष्ट झाले आहे. उपरोक्त घटनेस प्रतिबंध केला जाऊ शकतो आणि संमतीशिवाय कोणत्याही ग्रुपमध्ये समावेश सेटिंग्ज बदलून थांबवता येऊ शकतो," असे यात म्हणाले आहे.



कशी करावी सेटिंग अपडेट
?

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्हॉट्सअॅप चॅटची सेटिंग्ज बदलली पाहिजेत. ज्यात केवळ त्यांच्या संपर्क यादीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांकडूनच त्यांना एखाद्या ग्रुपमध्ये समाविष्ट करता येईल.

अलीकडेच लष्कराच्या दोन जवानांना पाकिस्तानी व्हर्च्युअल हेरांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. वर्गीकृत माहिती मिळविण्यासाठी सोशल मीडियावर भारतीय संरक्षण कर्मचार्‍यांशी गप्पा मारत आणि संवाद साधत. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली ज्यात ग्रुप कॅप्टनपर्यंतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाकिस्तानी हेरांनी अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केला. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर लष्कराने आपल्या कर्मचार्‍यांना कोणत्याही अज्ञात व्हॉट्सअॅप ग्रुपचा भाग न होण्याचा इशारा दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@