नाशिकचा गड राखण्यास गिरीश महाजनांनी कशी वठविली संकटमोचकाची भूमिका? वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |



नाशिक : नाशिकचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत संकटमोचकाची भूमिका बजाविली. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपचे १० नगरसेवक फोडल्याचे समजते. त्यामुळे भाजपची सत्ता धोक्यात आली होती.परंतु महाजन ऐनवेळी पुन्हा भाजपचे संकटंमोचक ठरले. त्यांनी काँग्रेस आणि मनसेला हाताशी धरून त्यांनी भाजपची सत्ता राखल्याचे चित्र निवडणुकीवेळी सभागृहात दिसून आले.

 

नाशिक महानगर पालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी सकाळी ११ वाजता महानगर पालिका मुख्यालय राजीव गांधी भवनच्या सभागृहात पार पडली. चुरसहीन झालेल्या या निवडणुकीत भाजपने पुन्हा नाशिक मनपाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यास मिळविले. पुढील अडीच वर्षाच्या कालवधी साठी महापौरपदी भाजपचे नगरसेवक सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी भाजपच्याच नगरसेविका भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कामकाज पहिले.

 

राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील महाविकासआघाडीचा प्रयोग होण्याची अटकळ बांधली जात होती. त्यामुळे ६५ इतके पुरेसे संख्याबळ असताना देखील निवडनुकीपूर्वी भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, काल ऐनवेळी सभागृहात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे,काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. महापौर पदासाठी व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या वेळेत कुलकर्णी व बागुल वगळता इतरांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौर पदासाठीचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे पीठासीन अधिकारी मांढरे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा यावेळी केली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी देखील भाजपाला साथ दिली. त्याचप्रमाणे भाजपाच्या दहाही बंडखोरांनी बंडखोरी मागे घेत भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

 

नाशिक महानगर पालिकेत भाजपला बहुमत होते. तरी देखील भाजपमध्ये असलेले व विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादित दाखल झालेले. तसेच, विधानसभा निवडणूक पश्चात शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल होण्याची चर्चा रंगली होती. तसेच,दहापेक्षा अधिक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने सोळाव्या महापौरपदी कोण बसणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली होती. त्यातच भाजपचे नगरसेवक फुटल्याचा बातम्या देखील दरम्यानच्या काळात येत होत्या. मात्र असे असले तरी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे बळ असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. ुसरीकडे मनसेसह काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मत मांडले होते. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या या निवडणुकीत सभागृहात नेमके काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, नाशिक मध्ये महापौर पदासाठी होऊ घातलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फासल्याने ही निवडणूक राज्यातील नव्या सत्ता समीकरणांची नांदी ठरणार काय याबाबत आता नागरिकांनी तर्क वितर्क लढविण्यास सुरुवात केली आहे.

 

उपमहापौर निवडवेळी शिवसेना सभागृहाबाहेर

महापौरांची निवड झाल्यानंतर उपमहापौर निवडीचे सोपस्कार सुरु झाले. अर्ज माघारी नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नगरसेवक साभृहातून बाहेर पडले. नवीन उपमहापौरांची निवड ऐकण्यासाठी त्यांचे कोणतेही नगरसेवक सभागृहात हजर नव्हते. मात्र, काँग्रेस, मनसे चे नगर सेवक सभागृहात बसल्याचे दिसून आले.

 

कार्यकाळात जनतेची सेवा करणार

बिनविरोध निवड झाल्याचा मोठा आनंद आहे. माझ्या कार्यकाळात नाशिककर नागरिकांची सेवा करण्यासच माझे प्राधान्य असणार आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडविण्यास माझे प्राधान्य असणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी पालकमंत्री गिरीश महाजन , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास सार्थ ठरविणारे कार्य करणार आहे. फडणवीस यांच्या दत्तक नाशिकच्या योजना पुढे नेण्याचा माझा मनोदय आहे.



- सतीश कुलकर्णी, नवनिर्वाचित महापौर, नाशिक

या वयात संधी दिल्याबद्दल आभार

वयाच्या ८५ व्या वर्षी मला उपमहापौर पदाची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. मी यापुढे देखील सर्वांच्या स्मरणात राहील असे चांगले काम करणार आहे.

- भिकूबाई बागुल , नवनिर्वाचित उपमहापौर, नाशिक

तरुणांना लाजवेल असे काम आई करेल

आईचे वय जरी ८५ असले तरी तरुणांना लाजवेल असे काम माझी आई करेल. आई मागील ३ वेळेपासून नगरसेविका आहे. राज्यातील सर्वात वयोवृद्ध नगरसेविका म्हणून तिची निवड झाली तेव्हा मिडीयात चर्चा होती. आईची काम करण्याच्या इच्छाशक्ती मुळे ती नक्कीच उत्तम काम करेल याचा मला विश्वास आहे.

सुनील बागुल, भिकूबाई बागुल यांचे पुत्र तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजप

 

सुसंस्कृत महापौर मिळाला

सतीष कुलकर्णी यांच्या रूपाने मितभाषी, सुसंस्कृत,भाजप निष्ठावाण असा महापौर लाभला आहे. ते जेष्ठ आणि चांगले असल्याने त्यांना आम्ही पाठिंबा दिला.

- शाहू खैरे, नगरसेवक, काँग्रेस

अनुभवाची तिजोरी असणारे महापौर व उपमहापौर लाभले

सतीष कुलकर्णी हे आदर्श नगरसेवक आणि जेष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची निवड सार्थ आहे. तसेच, भिकूबाई बागुल या देखील जेष्ठ सदस्या आहेत. त्यामुळे अनुभवाची तिजोरी असणारे महापौर व उपमहापौर लाभले आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेन चुरस निर्माण केली होती. भाजपचे नगरसेवक आमच्या तंबूत आल्याने भाजपला कुलकर्णी यांच्या रूपाने एका निष्ठावनंताला उमेदवारी द्यावी लागली हे स्वागतार्ह आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्ष नेता , शिवसेना नगर सेवक

नवनियुक्त महापौर सतिष कुलकर्णी व उपमहापौर भिकुबाई बागुल यांचे अभिनंदन करताना पीठासीन अधिकारी सुरज मांढरे, माजी महापौर रंजना भानसी व नगर सेवक

@@AUTHORINFO_V1@@