नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |


 


नाशिक : सत्तास्थापनेच्या वाटाघाटीत शुक्रवारी अनेक महापालिकेचे महापौरांची निवड झाली. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत मनसेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या पक्षात आपले मत नोंदवले. तसेच, राज्यात सत्तास्थापनेसाठी चालू असलेला 'महाविकासआघाडी'चा प्रयोग नाशिकमध्ये मात्र फसला. तसेच, भाजपच्या दहाही नगरसेवकांनी बंडखोरी मागे घेत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

 

राज्यामध्ये होत असलेल्या 'महाविकासाआघाडी' प्रमाणे नसिकमध्येसुद्धा शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर निवडून येतो का? याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवाय, महाविकासआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला होता आणि महाविकासआघाडीला सुरुंग लागला. त्यामुळे आता नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@