जेएनयु आझादी ब्रिगेडचा बालेकिल्ला: प्रा. अश्विनी मोहपात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) जेएनयु टीचर्स असोसिएशन (जेएनयुटीए) या शिक्षक संघटनेचा अराजकतावादी विद्यार्थ्यांना पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप प्राध्यापकांच्या एका गटाने केला आहे. शिक्षकावर सातत्याने होणार्‍या हल्ल्यांचा निषेध करण्याविषयी जेनएनयुटीने बोटचेपी भूमिका घेतल्याचा निषेध करीत ११२ प्राध्यापकांनी ते संघटनेचा भाग नसल्याचे जाहीर केले आहे. जेएनयु हे आझादी ब्रिगेडचा बालेकिल्ला झाला असल्याचा गंभीर आरोप विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अश्विनी मोहपात्रा यांनी केला आहे.

जेनएयुमध्ये विद्यार्थ्यांचा एक गट नेहमीच प्राध्यापकांना लक्ष्य करीत असतो. प्राध्यापकांवर हिंसक हल्ले करणे, त्यांची बदनामी करणे, कुटुंबीयांना धमक्या देणे असे प्रकार सातत्याने घडत असतात. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या एका हिंसक झुंडीने एका प्राध्यापिकेस ओलिस ठेवले होते. त्याचप्रमाणे रात्रीबेरात्री प्राध्यापकांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात येते.

या सर्व प्रकाराचा निषेध करण्याऐवजी जेएनयुटीए या शिक्षक संघटनेच्या काही प्राध्यापकांचा अराजकतावादी विद्यार्थ्यांना पाठिंबा असल्याचे दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. जेएनयुमधील ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिज’चे अधिष्ठाता डॉ. अश्विनी मोहपात्रा यांनी जेएनयु आझादजी ब्रिगेडचा बालेकिल्ला झाला असल्याचा आरोप केला आहे. जेएनयुटीएच्या धोरणाचा निषेध म्हणून ११२ प्राध्यापकांनी जेएनयुटीसोबतचे सर्व संबंध तोडत असल्याचे जाहीर केल्याचेही डॉ. मोहपात्रा यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@