दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारताच्या बरोबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |




वॉशिंग्टन : भारताला एक महत्त्वाचा मित्रपक्ष आणि अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार म्हणत कॉंग्रेसचे सदस्य फ्रान्सिस रुनी यांनी म्हटले आहे की ,"दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या लढाईत तसेच देशाला भेडसावणाऱ्या अन्य भौगोलिक व प्रादेशिक धोक्यांचा सामना करण्यासाठी वॉशिंग्टन भारताच्या सोबत आहे."


अमेरिकेत भारतीय राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांची भेट घेतल्यानंतर भाषणात रूनी म्हणाले
, "भारताला अनेक क्षेत्रीय आणि भौगोलिक राजनैतिक धोक्यांचा सामना करावा लागतो. इस्लामिक बंडखोरांचा भारताला सतत धोका आहे. ते जम्मू-काश्मीर आणि भारतातील इतर भागात दहशत पसरवत आहे. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या लढाईत दिल्लीतील सरकारचे आम्ही समर्थन केले पाहिजे तसेच अमेरिकेने भारताच्या बरोबरीने लढा देऊ." रुनी म्हणाले की, वॉशिंग्टनने भारताशी व्यापार संबंध दृढ करण्यासाठी, द्विपक्षीय थेट परकीय गुंतवणूकी वाढविणे आणि मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीचा विचार करणे आवश्यक आहे. ते म्हणाले, परदेशातील धोक्यांशी सामना करण्यासाठी, आपले आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी आणि जगभरातील स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या कार्यात पुढे जाण्यासाठी आपण एकत्र काम करत राहिले पाहिजे."

@@AUTHORINFO_V1@@