महाराष्ट्रात पाऊस परतणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |


प्रदीर्घ कालावधीसाठी कोरडे हवामान अनुभवल्यानंतर, महाराष्ट्र राज्यात पाऊस परतणार आहे. स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी येत्या २४ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सातारा येथे पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता आहे.

कर्नाटक किनारपट्टीपासून कोकण आणि गोव्याच्या मध्य भागांपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम म्हणून हा पाऊस आहे. तथापि, ही प्रणाली वातावरणात खालच्या थरात असल्याने आणि मजबूत नाही, त्यामुळे तीव्रता कमी असेल.

ईशान्येकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बर्‍याच भागात किमान तापमान खाली आले आहे. १८ नोव्हेंबर रोजी मुंबईतील किमान तापमान २४ अंश सेल्सियस इतके होते, ते आज सकाळी २१ अंशापर्यंत खाली आले असून ते आतापर्यंतचे सर्वात कमी असल्याचेही निदर्शनास आले आहे.

खरे तर, सतत तापमानात घट झाल्याने विदर्भाचे हवामान थंड झाले आहे. यवतमाळमध्ये किमान १३ अंश, तसेच अमरावती १४.६ आणि नागपूर व अकोला प्रत्येकी १७ अंशावर आले आहे.

तथापि, तापमानात आणखी घट होण्यास मज्जाव होईल कारण लागोपाठ येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा येईल आणि पुढच्या २४ तासांनंतर तापमानात किरकोळ वाढ होईल.

महाराष्ट्र राज्यात मान्सून हंगामात पावसाने चांगली कामगिरी केली. ऑक्टोबर महिन्यातही मान्सूनचा लांबलेला पाऊस तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोकण आणि गोवा तसेच पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अपवादात्मक पाऊस झाला. तसेच ८ नोव्हेंबरच्या सुमारास चक्रीवादळा माहा नेही उत्तर मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात विखुरलेला पाऊस पडला.

@@AUTHORINFO_V1@@