'विकी वेलिंगकर' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. या उत्कंठावर्धक ट्रेलरमध्ये अभिनेत्री सोनाली म्हणजे चित्रपटातली 'विकी वेलिंगकर' ही सतत पळत, तिला पडणाऱ्या कोड्यांची उत्तरं शोधताना दिसतेय. चित्रपटाची कथा एका कार्टूनिस्ट च्या आयुष्याभोवती फिरते. आपला कोणीतरी पाठलाग करतंय असा तिला सतत होणार भास... हा नेमका भास की सत्य, याचं उत्तर ती शोधतेय. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का, हे पाहणं प्रेकक्षकांसाठी नक्कीचं उत्कंठावर्धक ठरणार आहे.