'संज्याला रड्या ऑफ दि इयर दिला पाहिजे!' : निलेश राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : सध्या सत्तास्थापनेसाठी चाललेली शिवसेना आणि आघाडीची बोलणी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे विविध गोष्टींवरून केलेली वक्तव्ये, यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण घडामोडींचे चालू आहे. नुकतेच, संजय राऊत यांनी आसनव्यवस्तेवरून तांडव करत राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांना पात्र लिहिले. यावरून आता निलेश राणेंनी 'संज्याला रड्या ऑफ दि इयर दिला पाहिजे!' अशा एकेरी शब्दात सडकुन टीका केली आहे.

 
 
 

"तिसऱ्या रांगेवरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. २०१९चा रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड संज्याला दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे. पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच, असे म्हणत निलेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली. यापूर्वीदेखील निलेश राणेंनी त्यांच्यावर अनेकवेळा टीकास्त्र सोडले आहे.

@@AUTHORINFO_V1@@