नाशिकचा महापौरपदासाठी चुरस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |




नाशिक : नाशिक महानगरपालिका ‘महापौर’ आणि ‘उपमहापौर’ निवडणुक शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सकाळी दाखल अर्ज छाननी, अर्ज माघारीचे सोपस्कार पार पडतील. यानंतर महापौर व उपमहपौरपदाची निवडणूक पार पडेल. यासाठी ११ नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत.

 

उपमहापौरपदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. भाजप आणि सेनेच्या इच्छुकांबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांनीदेखील अर्ज केले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच प्रमुख पक्षांचे नेते आणि उमेदवार महापालिकेच्या राजीव गांधी भवनात दाखल झाले होते. महापौरपदासाठी भाजपच्या पाच तसेच शिवसेनेच्या चार उमेदवारांखेरीज काँग्रेसच्यावतीने राहल दिवे यांनी आणि भाजपचे बंडखोर कमलेश बोडके यांनी अर्ज दाखल केला.

 

उपमहापौरपदासाठी भाजपने शिफारस केलेल्या चार संभाव्य उमेदवारांखेरीज भाजप बंडखोर कमलेश बोडके आणि सुनीता पिंगळे यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्यावतीने विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसच्यावतीने शाहू खैरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. हेमलता पाटील यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्यावतीने जीन सुफीयान यांनीच एकमेव अर्ज दाखल केला.

@@AUTHORINFO_V1@@