ठाणे महापालिकेच्या महापौरपदी नरेश म्हस्के बिनविरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |



ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे २२ वे महापौर म्हणून शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्याच पल्लवी कदम यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, जितेंद्र आव्हाड, मावळत्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त अशोक बुरपल्ले आदी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मुंबई उपनगर मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.


राष्ट्रवादीशी सोयरिक

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे शिवसेनेचे महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. महापौर नियुक्तीच्या आजच्या जंगी कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.


मी विकासरथाचा सारथी
, ठाणेकरांचे जीवन समृद्ध करणार : नरेश म्हस्के

"गेली २५ वर्षे ठाणे शहराच्या जडणघडणीत शिवसेनेचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी मतपेट्यांमधून व्यक्त केलेल्या विश्वासाला शिवसेनेने कधीही तडा दिला नाही. ठाणे शहराच्या महापौरपदी वर्णी लागल्याने या विकासरथाचे सारथ्य माझ्याकडे आले आहे. शहराच्या विकासरथाची घौडदौड यापुढेही कायम ठेवत शहवासीयांचे दैनंदिन जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी मी कटिबद्ध आहे," असे वचन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी दिले.

@@AUTHORINFO_V1@@