उद्धवजी तुम्ही फसवलात आम्हाला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |


 
औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध फसवणुकीची तक्रार


औरंगाबाद : एकीकडे सत्तास्थापनेचा घडामोडी सुरु असताना दुसरीकडे शिवसेना नेत्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंसमवेत औरंगाबादच्या २ नेत्यांचा समावेश आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत महासेनाआघाडी करुन, सत्तास्थापन्याच्या वाटाघाटी सुरु केल्या आहेत. यावरून औरंगाबादमध्ये तक्रारदाराने आक्षेप घेतला असून या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही नाव आहे.

 

महायुतीच्या नावाखाली मते घेतली आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार, रत्नाकर भीमराव चौरे यांनी पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांची नावं आहेत. औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

तक्रारदाराचे काय म्हणणे आहे?

 

''विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सेना-भाजप महायुतीला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले. निवडणूक निकालामध्ये भाजप समर्थकांची मते पाहता प्रदीप जैस्वाल निवडून आले. निकालांतर शिवसेनेने भाजपशी युती तोडली आणि महायुतीसोबत सरकारही स्थापन केले नाही. त्यामुळे मी भाजप समर्थक आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेले मतदान वाया गेले. हिंदुत्वाच्या नावे मते मागून माझी फसवणूक केली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा." असे तक्रारदार रत्नाकर चौरे यांनी आपल्या तक्रारीत सांगितले आहे.

@@AUTHORINFO_V1@@