राफेलची ३ विमाने भारतीय वायुसेनेत ; वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेला तीन राफेल विमाने सुपूर्द करण्यात आली आहेत. वायुसेनेचे वैमानिक आणि तंत्रज्ञ सध्या या विमानांचा वापर करुन प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती सरकारने बुधवारी दिली. ८ ऑक्टोबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन पहिल्या राफेल विमानाचा ताबा घेतला होता. चार विमानांचा समावेश असणारी राफेलची पहिली बॅच ही मे २०२० पर्यंत भारतात दाखल होणार आहे.

 

सप्टेंबर २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल विमानांसाठी साधारणपणे ५९ हजार करोड रुपयांचा करार झाला होता.यामधील ३ राफेल विमाने ही भारतीय वायुसेनेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. भारतीय वायुसेनेचे वैमानिक आणि तंत्रज्ञ हे फ्रान्समध्ये त्यांचा वापर करून प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेमध्ये दिली.

@@AUTHORINFO_V1@@