आरबीएल बँकेतील ग्राहकांना लाखोंचा गंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |



नाशिक : आरबीएलच्या खातेधारकांना गेल्या १० दिवसात ऑनलाईन बँक फसवणुकीचा सामना करावा लागला. बँकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपीनंबर मिळवित हॅकर्सने आरबीएल बँक क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा घातला. गेल्या १० दिवसात ३२ ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा ग्राहकांना संशय असून पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

 

संशयितांनी कार्डच्या माध्यमातून शहरातील ग्राहकांच्या खात्यातील १६ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने लांबवले. महेश विश्वनाथ मेखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "महेश मेखे यांच्याकडे आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांना फोन आला होता. बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून भामट्याने त्यांचा विश्वास संपादन केला. संशयितांनी कार्डची आणि ओटीपी नंबरची माहिती मिळवली. त्यांच्या क्रेडिट खात्यावर डल्ला मारला. शहरात अशा अनेक ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहे." अशी माहिती पोलिसांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@