ब्रेकींग ! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चर्चेचा बार फुसका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा विरोध मावळल्यानंतर बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक कोणताही निर्णय न घेता संपलीजवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत नंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकारांना सांगितले की, "शिवसेनेच्या सरकारबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि उद्या ही चर्चा पुढे सुरू राहील." आघाडीच्या या भूमिकेनंतर शिवसेनेच्या नेतृत्वाची मात्र पत्रकारांना उत्तरे देताना तारांबळ उडाली होती.

 

सोनिया गांधींनी थेट शिवसेनेसोबत चर्चा सुरू केल्याच्या संशयाने राष्ट्रवादी घेरली तर राष्ट्रवादीने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितल्याने चर्चा अडल्याचे काँग्रेसमधील माहीतगार सांगतात. बुधवारी सकाळी संजय राऊत यांनी दिल्ली येथे पत्रकारांना सांगितले होते की, "आजची आघाडीची बैठक ही या विषयातील शेवटची बैठक असेल. पेढ्यांची ऑर्डर दिलेली आहे. उद्धव ठाकरे तुम्हाला गोड बातमी सांगतील," असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. मात्र, आघाडीने शिवसेनेच्या सत्तास्थापनेच्या आशेवर तूर्तास पाणी फिरविल्याचे या बैठकीनंतर दिसले.

 

पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या महत्त्वपूर्ण म्हणून सांगितल्या गेलेल्या बैठकीत शिवसेनेला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही, यावरच चर्चा झाल्याचे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. या बैठकीत काँग्रेसकडून अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, जयराम रमेश, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@