दिवस-रात्र कसोटी सामन्याची उत्सुकता शिगेला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारत आणि बांग्लादेश या दोन संघांमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. येत्या २२ नोव्हेंबरला कोलकत्ता येथे हा सामना खेळवला जाईल. बीसीसीआयने प्रथमच दिवस रात्र कसोटी सामन्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याचे विशेष आकर्षण आहे. भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. त्यामुळे २ कसोटी सामान्यांच्या मालिकेमध्ये भारत १-० असा आघाडीवर आहे.

 

गुलाबी चेंडूचे आकर्षण

 
 
 

या सामान्यचे अजून एक आकर्षण म्हणजे वापरण्यात येणार गुलाबी चेंडू. साधारण कसोटीमध्ये लाल रंगाच्या चेंडूचा वापर करण्यात येतो. मात्र, दिवस-रात्र कसोटीत लाल चेंडू स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे गुलाबी चेंडूचा प्रयोग केला जाणार आहे. चेंडू लवकर खराब होऊ नये यासाठी गुलाबी चेंडूवर लाल चेंडूपेक्षा अधिक रंग वापरण्यात आला आहे. चेंडूवर अधिक चमक असल्याने वेगवान गोलंदाजांना स्विंग देखील चांगले मिळेल. सौरव गांगुली यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@