'इराण मिलिटरी पॉवर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019   
Total Views |


 


अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, मध्यपूर्व देशांच्या तुलनेत इराण हा सर्वाधिक क्षेपणास्त्र असलेला देश ठरला आहे. अमेरिकन सैन्याच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने ही माहिती दिली. 'इराण मिलिटरी पॉवर' नामक या अहवालाने जगाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पातळीवर दीर्घ परिणाम जाणवणार आहेत हे निश्चित.

 

जागतिक महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी सुरू असलेल्या या हालचाली जगाला तिसर्या महायुद्धाच्या खाईत ढकलत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. इराणची सत्तापिपासू वृत्ती जगाला विनाशाकडे नेत असल्याची जाणीव अमेरिकेला यापूर्वीच झाली, त्यामुळे संधी मिळेल तेव्हा इराणच्या अशा मनसुब्यांना ठेचण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला. अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर एक अत्याधुनिक वायुदल बनविण्यात अयशस्वी ठरलेल्या इराणने पडद्यामागील आपल्या हालचाली काही बंद केल्या नाहीत. उलट आणखी वेगाने काम करत संरक्षण क्षेत्रातील आपली गुंतवणूक सुरूच ठेवली.

 

इराणने विस्तृत स्वरूपात क्षेपणास्त्र निर्मिती सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आल्यानंतरही इराण आपल्या शस्त्रास्त्रांमध्ये वाढ करत आहे. या अहवालात नेमके आहे तरी काय? ज्यामुळे अमेरिकेची झोप उडवली आहे. या अहवालातील पान क्रमांक ३० वर उल्लेख केल्यानुसार, इराणकडे मध्यपूर्व देश म्हणजेच बहरीन, इराक, इस्रायल, यमन, जॉर्डन, कतार,कुवैत, लेबनॉन, ओमान, फिलिस्तान, यमन, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात, सायप्रस आदी १५ देशांच्या यादीत इराणचा क्रमांक क्षेपणास्त्रांच्या यादीत अव्वल लागत आहे.

 

इराणकडे कमी, मध्यम व जास्त अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी क्षेपणास्त्र तैनात आहेत. दोन हजार फुटांवर असलेला शत्रूूंचा तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेले मिसाईल आहे. याशिवाय लॅण्ड अटॅक क्रूझ मिसाईल बनविण्याची तयारीही करत आहे, यात एकाच वेळी सभोवतालच्या सर्वच तळांना नेस्तनाबूत केले जाऊ शकते. इराणच्या दक्षिण तटावर समुद्रावरील तटरक्षीय दलाकडे असलेल्या क्षेपणास्त्रात ३०० किमी दूरवर असलेल्या जहाजांना भेदण्याची क्षमता ठेवतात. आपल्या शत्रूंवर जरब बसवण्यासाठी नौदल, वायुदल आणि लष्कराच्या माध्यमातून इतर राष्ट्रांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इराण करत आहे. इराणच्या समुद्रात सुमारे पाच हजार सुरूंग लावण्यात आले असून दबाव वाढल्यानंतर ती सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे समुद्रमार्गे आक्रमण करणार्या शत्रूंना थोपवण्यासाठी किंबहुना सीमेलगत दबदबा निर्माण करून लगतच्या देशांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सातत्याने इराण करत आहे.
 

एका अहवालानुसार, इस्लामिक क्रांतीनंतर इराण अस्तित्वात आला. त्यानंतर या क्रांतीतील त्यांच्या नेत्याला सुप्रीम लीडर म्हणून संबोधित करण्यात आले. राजकीय आणि धार्मिक बाबतीतही त्याचे मत महत्त्वाचे ठरू लागले. १९५३ मध्ये सत्तापालट झाल्यावर सत्तेत आलेल्या मोहम्मद रझा शाह यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राला मजबूत करण्याचे काम केले. सैन्याच्या विकासाचे काम याच काळात झाले. १९६० ते १९७० या दहा वर्षांत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची खरेदी झाली. एफ-४, एफ-५, एफ-१४ विमान, एएच-१ कोब्रा अटॅक हेलिकॉप्टर, एम ६० आदी क्षेपणास्त्रांचा यात सामावेश होता.

 

ब्रिटन, फ्रान्स, सोव्हिएत संघाकडूनही शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात आली. त्यानंतर चीनकडूनही हत्यारांची खरेदी करण्यात आली. इराणवर सध्या प्रतिबंध लावण्यात आला आहे, याची अंतिम मुदत ही ऑक्टोबर २०२०पर्यंत संपणार आहे. यानंतर इराणला पुन्हा शस्त्रसाठा करण्याची आयती संधी मिळणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी २००६मध्ये इराणवर बंदी घातली होती. यावेळी लावण्यात आलेली बंदी अण्वस्त्र करार लागू झाल्यानंतर पाच वर्षांनंतर संपुष्टात आली.

 

बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना अण्वस्त्र करार लागू करण्यात आला होता. मात्र, अमेरिका, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि रशिया यांच्यात झालेल्या करारातून ट्रम्प सरकारच्या काळात अमेरिकेने माघार घेतली. इराण-इराक यांच्या युद्धात इराकला वेळोवेळी पाश्चिमात्त्य देशांनी मदत केल्याचा आरोप इराण लावत आला आहे. इराकला होणारी मदत पाहता इराणला आपले संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. १९ नोव्हेंबर रोजी तेहरान येथे झालेल्या एका कार्यक्रमात इराण सुप्रीम लीडर आयतोल्ला अली खामेनेई यांनी निर्बंध हटल्यानंतर नेतृत्व परिवर्तनाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इराणच्या या निर्णयाचे पडसाद एकूणच जगावर उमटणार हे नक्की...!
@@AUTHORINFO_V1@@