संविधान दिनानिमित्त भाजपतर्फे विशेष कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |
 


मुंबई : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चातर्फे २६ नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंगळवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

 

बैठकीला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश तंवर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जयरामजी, माजी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आ. भाई गिरकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत हिवराळे, अशोक कानडे व सुखदेव अडागळे उपस्थित होते. संविधान दिनाच्या निमित्ताने भाजपा, महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात आणि पक्षाच्या संघटनात्मक मंडलात २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@