पवारांपासून दूर राहा उद्धव ठाकरेंना सेना नेत्यांचा सल्ला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : शरद पवारांनी सत्तास्थापनेबद्दल 'गुगली' टाकल्यानंतर उद्धव ठाकरे यांना 'आस्ते कदम' टाकण्याचा सल्ला शिवसेना नेत्यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. शरद पवारांपासून शिवसेनेने दोन हात दूर राहावे, असेही मत सेनानेत्यांच्या एका गटाने व्यक्त केले आहे. तसेच भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करून सरकार स्थापन करावे, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.

 

शरद पवारांनी महाशिवआघाडीतील हवा काढून घेतल्यानंतर शिवसेनेतील आमदार नेतेमंडळींना चिंता सतावत आहे. अद्यात कुठलीही चर्चा न झाल्याचे पवारांनी सांगितल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. राज्यात सत्तास्थापनेबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सकाळी 'जय महाराष्ट्र', अशा आशयाचे ट्विट केले होते. 'अगर कुछ पाना हो तो तरीके बदलो इरादे नही!, असे ट्विट राऊतांनी केले. त्याबद्दलही आता नव्या शक्यता व्यक्त केल्या जात आहे.




@@AUTHORINFO_V1@@