सावरकरांना भारतरत्नसाठी शिफारशींची गरज नाही : केंद्र सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : 'स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' देण्याची गेल्या काही वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र, सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही. योग्यवेळीच 'भारतरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय घेतला जातो,' असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सावरकरांना पुरस्कार देण्याबाबतच्या प्रश्नावर हे उत्तर दिले. भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी सावरकरांना 'भारतरत्न' कधी देणार? असा प्रश्न उपस्थित केला होता.

 

'भारतरत्न पुरस्कार' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सावरकरांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा भाजपने केली होती. शिवसेनेनेही अनेकदा सावरकरांना 'भारतरत्न पुरस्कार' देण्याची मागणी केलेली आहे. 'पद्म' पुरस्कार आणि 'भारतरत्न' हे सन्मान देण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. 'पद्म पुरस्कार' देण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली जाते. पण 'भारतरत्न' हा सन्मान देताना अशी कोणतीही समिती नसते. हा विषय थेट पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असतो.

@@AUTHORINFO_V1@@