पूर्वी केजरीवाल एकटे खोकायचे आता प्रदुषणामुळे संपूर्ण दिल्ली खोकतेय !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाच वर्षांपूर्वी एकटेच खोकायचे आता मात्र, प्रदुषणामुळे संपूर्ण दिल्ली खोकत आहे, असा टोला भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी लगावला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिल्लीत सुरू असलेल्या प्रदुषणासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला.

 

ते म्हणाले, " मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील प्रदुषणाला संपूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांनी स्वतःजवळ कुठल्याही खात्याचा कार्यभार घेतला नाही, जेव्हा अशी परिस्थिती येईल त्यावेळी ते स्वतःला नामनिराळे ठेवतात. दिल्लीतील वाढती वाहनांची संख्या आणि बांधकामामुळे उडणारी धूळ प्रामुख्याने प्रदुषणाला कारणीभूत आहे, यावर उपाय करण्याऐवजी केजरीवाल जाहीरातींवर सहाशे कोटी खर्च करत आहेत. समान विषम कायद्यासाठीही ७० कोटी रुपये खर्च झाले. दिल्लीत प्रदुषण एका महामारीचे रुप घेत आहे. रुग्णालयात ३०-३५ वर्षांचे तरुण प्रदुषणामुळे आजारांशी लढत आहेत."
 

जम्मू काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना कमी

दरम्यान, संसदेत जेएनयू, काश्मीर आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. काश्मीरप्रश्नी उत्तर देताना केंद्र सरकाने दगडफेकीचे प्रकार आणि फुटीरतावाद्यांकडून केला जाणाऱ्या कुरापती कमी झाल्याची माहिती देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@