मी लाचखोर नाही ! वीज अभियंत्याने कार्यालयात लावला फलक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |


 


तेलंगणा : तेलंगणातील करीमनगर येथील अतिरिक्त विभागीय वीज अभियंते पोडेईती अशोक यांनी स्वतःच्या कार्यालयात 'मी लाचखोर नाही', असा फलक लावला आहे. या प्रकारामुळे त्यांच्या कार्यालयात वेगळीच चर्चा आहे. दरम्यान, त्यांनी असा फलक का लावला, याचे कारणही तितकेच गंभीर आहे. विजया रेड्डी यांच्या हत्येमुळे त्यांनी हा फलक लावल्याचे सांगितले.

 

काही दिवसांपूर्वी विजया रेड्डी या महिला तहसीलदाराला त्यांच्याच कार्यालयात जाळल्याचा कथित आरोप आहे. या प्रकारात रेड्डी यांचा मृत्यू झाला होता. तीस वर्षांच्या रेड्डी यांना वाचवताना अन्य दोन कर्मचारीही जखमी झाले होते. या प्रकाराचा एकप्रकारे निषेध करण्यासाठी अशोक यांनी हा फलक लावल्याचे समजते.

@@AUTHORINFO_V1@@