अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसाय लांबणीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |



ठाणे : यावर्षी दरवर्षीच्या सरासरी पावसाप्रमाणे अधिक काळ पाऊस पडला, त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेतीला जोडधंदा असलेला वीटभट्टी व्यवसायसुद्धा लांबणीवर पडला आहे.

ग्रामीण भागातील लोक शेतीला जोडधंदा म्हणून वीटभट्टी व्यवसाय करतात, परंतु अवकाळी पाऊस उशिरापर्यंत पडल्यामुळे ग्रामीण भागातील वीटभट्टी व्यवसायावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यातील लाखो वनवासी बांधव या व्यवसायावर काम करून उदरनिर्वाह करतात. परंतु, अवकाळी पावसाचे चिन्ह दिसत असल्यामुळे वीटभट्टी व्यवसाय दरवर्षीपेक्षा महिनाभर उशिरा सुरू होणार आहे. याचाच परिणाम वनवासी बांधवांच्या रोजगारावर झाला, यामुळे लाखो वनवासी बांधवांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे शेतीचे झालेले नुकसान आणि जोडधंदा म्हणून वीटभट्टी व्यवसायाला सुरुवात करायची किंवा नाही या विवंचनेत वीट उत्पादक मालक आहेत. कारण, असाच अवकाळी पाऊस पडला तर लाखो रुपयांचा कच्चा वीट माल मातीमोल होतो. त्यामुळे मुरबाड तालुक्यासह शहापूर, अंबरनाथ, भिवंडी उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, वाडा-मोखाडा व इतर तालुक्यांतील वनवासींच्या रोजगारावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.

@@AUTHORINFO_V1@@