बसपचे ‘पैर छुओ अभियान’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019   
Total Views |



मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी उत्तर प्रदेशातील ब्राह्मण सवर्णबहुल गावांमध्ये जातील. तिथल्या ब्राह्मणांचे पाद्यपूजन करतील. त्यांचे आशीर्वाद घेऊन ब्राह्मणांना सामाजिक एकतेचे अर्थात राजकारणातल्यासोशल इंजिनिअरिंगचे तत्त्व समजावतील. बसपच्या या आंदोलनाचे नाव आहेपैर छुओ अभियान.’ त्यासाठी बसपने एक वेगळे दलही तयार केले, असे वाचनात आले. बसपचे राष्ट्रीय महासचिव सतीश मिश्र यांचे म्हणेआदेशआहेत. अर्थात, बसपमध्येही पक्षाध्यक्षा बहन मायावती यांना विचारल्याशिवाय पानही हलत नाही, हे नक्कीच. देशात जातीभेद आहे, हे खरे आहे. असे जरी असले तरी सगळेच सवर्ण किंवा सरळसरळ ब्राह्मण व्यक्तीसमोरच्या व्यक्तीने माझी पूजा करावी आणि मग मी त्याला आशीर्वाद किंवा शाप देईन, या भूमिकेत नाही. जातीअंताची लढाई लढणारे अनेक शेवटी जातीयतेचे मसिहा होतात हेच खरे. त्यामुळेच महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांना जिंकण्यासाठी जातीपातीचे गट पाडून उमेदवार निवडावे लागले. जात वर्गीकरणाला त्यांनीअलुतेदार-बलुतेदारशब्दांची खमंग फोडणीही दिली, तर तिथे उत्तर प्रदेशातही जातीचा जोर लोकांमध्ये नसला तरी नेत्यांच्या रक्तात भिनलेला! त्यामुळेच यादव-मुस्लिमांची जोडी बनूवन सप कायमसायकलहाकत असते आणि लालूंच्या राजदचीलालटेनही याच बळावर टिमटिमते. बसपचाहत्तीवर्णव्यवस्थेच्या चार पायांत अजूनही गुरफटलेला. ब्राह्मण असो की मागासवर्गीय, प्रत्येक व्यक्तीला मनापासून सन्मान दिला, तिला विकासाच्या आणि माणूसपण जगण्याच्या संधी दिल्या तर ती व्यक्ती कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही, हे नक्की. पण, सच्च्या मानवतावादाचा पाया नसल्याने सप- बसप-राजदसारखे राजकीय पक्ष हा भाव समजू शकत नाही. हा भाव पंतप्रधान मोदींनी जाणला. त्यांनी स्वच्छताकर्मींचे पाद्यपूजन केले. त्यात इतिहासाला कलाटणी द्यायची साक्ष होती. त्याचीचकॉपीबसपने करायचे ठरवले आहे. पण हीकॉपीएकदम उलटी. इथे मनाचा, श्रद्धेचा भाव नाही. तर, ‘आम्ही तुमचे पाय पुजतो, तुम्ही आम्हाला मत द्याची ही लबाडी आहे. जातीवरून माणसाची पूजा करण्याची ही संस्कृती बसप आता गावोगावी जागवणार. वा! जातीअंतापासून जातीपूजेचा हा बसपचा प्रवास केविलवाणा आहे.

तडप तडप के इस दिल से...

शहाण्या माणसाला ठेच लागली तर तो सावध होतो. इथे लिलावतीमध्ये ब्लॉकेजची पाळी आली तरी यांचे येदिल माँगे मोरचा ड्रामा सुरू आहे. त्यासाठी यांनीये दिल तुम बिन लगता नहीम्हणत त्यांच्या मागेपुढे करण्यास सुरुवात केली. मात्र, ‘१७०ची जपमाळ करणार्‍यांनाघड्याळाने लगेचदिल विल प्यार वार मै क्या जानू रे?’ म्हणत सत्तास्थापनेचा घोळ कायम ठेवला. तरीसुद्धा यांनीबत्तमिज दिल, बत्तमिज दिल माने ना,’ म्हणतधनुष्यबाणाचा निशाणाघड्याळाकडेच ठेवला. यांच्या दिलाचे पार तुकडे झाले पण, तिथून काही संकेत मिळाले नाहीत. गोड गोड हसत, बोलतघड्याळयांच्या दिलाला झुलवत राहिले. यांच्या शुभचिंतकांनी यांना समजावले, इशारे दिले. पण, ‘दिल आया गधी पर तो परी क्या चिज हैहे यांच्याबाबत १०० टक्के खरे झाले. त्यामुळेच तीन दशकांच्या आपल्या मित्राची साथ त्यांनी सोडली. त्यामुळे समोरच्याघड्याळाचीहाताच्या पंजासकट दिलजमाई सुरू झाली. हे दोघेहै अपना दिल तो आवारा, जाने किसपे आयेगाम्हणत यांना दररोज उद्याची तारीख देत राहिले. त्यांच्यातारीख पे तारीखवर हेसुद्धा आपलेदिल वारी जावाकरत मजनू झाले आहेत. ते म्हणतात, त्यांना समजण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील. यावर काय म्हणावे? यांना ते समजता येत नाहीत. याचा अर्थ दुसरे त्यांना समजू शकत नाही, असे थोडेच आहेत. ‘कमळआणिपंज्यानेही त्यांना चांगलेच समजून घेतले आहे. असो, ते दररोज यांना नादी लावतात आणि हे दररोज खुळावतात. एक प्रसिद्ध भावगीत आहेनाच नाचुनी अति मी थकले, थकले रे नंदलाला.’ पण यांच्या बाबतीतबोल बोलूनी अति मी थकलो, थकलो रे ’.. जाऊ दे ते नंदलाला बोलणार नाहीत. कारण, ‘थकलोहे सांगण्यासाठी त्यांनामातोश्री’, ‘सिल्वर ओक’, ‘दिल्लीवगैरेला वार्‍या कराव्या लागतील. मात्र, काहीही असो यांचा,‘दिल से दिल्लीतकचा सफर महाराष्ट्र विसरणार नाही. असो, काही दिवसांतच महाराष्ट्र यांना विचारणार आहेदिल तेरा किसने तोडा? यूँ तनहा किसने छोडा? आणि हे म्हणतीलतडप तडप के इस दिल से आह निकलती रही...’


@@AUTHORINFO_V1@@