आता वोडाफोन आयडियाही वाढवणार रेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |



मुंबई : रिलायन्स जियोने प्रति मिनिटाला ६ पैसे असे दर लागू केल्यानंतर आता वोडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलनेदेखील रेट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी फोन कॉल आणि डाटाचे दर १ डिसेंबरपासून वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलाच चाप बसणार आहे.

 

तीव्र स्पर्धा आणि केंद्रीय दूरसंचार विभागाला द्यावे लागणारे कोट्यवधी रुपये या कारणांनी एअरटेलसह व्होडाफोन आयडिया कंपनी अडचणीत आहे. व्यवसायात टिकून राहण्यासाठी व्होडाफोन आयडियाने रिचार्जचे दर डिसेंबरपासून वाढविण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षात प्रथमच व्होडाफोन आयडियाने दर वाढविणार असल्याचे जाहीर केले. तर व्होडाफोन आयडियापाठोपाठ एअरटेलही रिचार्जचे दर वाढविणार आहे. दोन्ही कंपन्यांनी किती दर वाढविणार आहे, हे अद्याप जाहीर केलेले नाही.

 

दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज लागते. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सतत गुंतवणूकीची गरज असते, असे भारती एअरटेलने म्हटले आहे. डिजीटल इंडियाला मदत करण्यासाठी दूरसंचार उद्योगाने यशस्वीपणे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे एअरटेलने पुढील महिन्यापासून दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे.

 

मुंबई शेअर बाजारात भाव वधारला

 

व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलने दरवाढीची घोषणा करताच मुंबई शेअर बाजारात या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स ३० टक्क्यापर्यंत वधारले. १ डिसेंबरपासून होणाऱ्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतणूकदारांनी दूरसंचार कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचे शेअर २९.७५ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर ५ रुपये ८० पैसे झाले आहेत. तर भारती एअरटेलचे शेअर ६.३१ टक्क्यांनी वधारून ४३५ रुपये झाले आहेत. भारती एअरटेलच्या शेअरची किंमत गेल्या ५२ आठवड्यातील सर्वाधिक आहे.

@@AUTHORINFO_V1@@