हिवाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी शिवसेनेचा गदारोळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी लोकसभेत स्पीकर ओम बिर्ला यांनी सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सभागृहात २ मिनिटांचा मौन पाळण्यात आला. संसदेच्या सुरुवातच शिवसेनेच्या गदारोळाने झाली.

 

शिवसेनेच्या खासदारांची संसदेबाहेर निदर्शने

 

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी भाजपने महायुती तुटल्याची घोषणा केली. त्यानंतर अधिवेशन सुरू असताना संसदेबाहेर शिवसेनेच्या खासदारांनी निदर्शने केली. महाराष्ट्रातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत जाहीर करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. शिवसेनेने यापूर्वी आपले केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला.

@@AUTHORINFO_V1@@