आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात ; शिवसेना विरोधी बाकावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती, प्रस्तावित नागरिकत्व विधेयक या आणि इतर विषयांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. यादरम्यान, दोन्ही सभागृहांमध्ये २७ विधेयके मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ विधेयके मंजूर करण्यात आली होती. त्यात जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि विशेष अधिकार रद्द करणारे विधेयक आदी विधेयकांचा समावेश होता.

 

देशाच्या विकास यात्रेला गती देईल हिवाळी अधिवेशन : पंतप्रधान

 

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'हे अधिवेशन देशाच्या विकास यात्रेला गती देईल', अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनामध्‍ये सर्व मुद्यांवर चर्चा व्‍हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

"हे २०१९ मधील महत्वाचे अधिवेशन आहे. हे राज्यसभेतील २५० वे अधिवेशन आहे. गेल्या काही दिवसांत सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली. मागील अधिवेशन अभूतपूर्व होते. सर्व पक्षांच्या खासदारांच्या सहकार्यामुळे मागील अधिवेशन यशस्वी झाले. त्याचे श्रेय सर्वांना जाते," असेही ते म्हणाले. "या अधिवेशनात सर्व मुद्यांवर चर्चा व्हावी. वाद आणि संवाद व्हावा. त्यातून निघणारे परिणाम देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे असेल", अशीही आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.

  

ही महत्वाची विधायक मांडली जाण्याची शक्यता

 

व्यक्तिगत माहिती संरक्षण, तृतीयपंथीयांचे हक्क व संरक्षण, इलेक्ट्रिक सिगरेट प्रतिबंध, औद्योगिक क्षेत्राशी निगडित संहिता, कर दुरुस्ती विधेयक, कंपनी दुरुस्ती विधेयक, चिट फंड दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, सरोगसी नियंत्रण विधेयक, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक.

@@AUTHORINFO_V1@@