मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे किशोरी पेडणेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर उपमहापौर पदाच्या नावावर अॅड. सुहास वाडकर यांच्यातर्फे अर्जदाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि आक्रमक नगरसेवक म्हणून पेडणेकर यांची ओळख आहे. तर सुहास वाडकर हे महापालिकेच्या विधी समितीवर कार्यरत आहेत.

 

२२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. मुंबई महापौरपदाचा प्रवर्ग खुला असल्याने त्या दृष्टीने शिवसेनेने लॉबिंग सुरू होती. काही नगरसेवकांनी वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी संपर्क करत महापौरपद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता. महापौरपदासाठी शीतल म्हात्रे, बाळा नर, रमाकांत रहाटे, सुजाता पाटेकर, मंगेश सातमकर, यशवंत जाधव, विशाखा राऊत आदी नेत्यांचा सामावेश होता. मात्र, अखेर किशोरी पेडणेकर यांच्या नावे शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, इतर कुठल्याही पक्षाने अर्ज दाखल न केल्याने दोघांचीही निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. 

@@AUTHORINFO_V1@@