स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांच्या हस्ते भारतीय पोषण कृषी कोषाचा प्रारंभ

    18-Nov-2019
Total Views |


महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि बिल व मेलिंदा गेट्स फाऊंडेशनचे सह अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे भारतीय पोषण कृषी कोषाचा प्रारंभ झाला. अधिक चांगल्या पोषणासाठी देशाच्या १२८ कृषी-हवामान क्षेत्रातल्या वैविध्यपूर्ण धान्यांचे भांडार हा कोष आहे.

इराणी यांनी आपल्या बीजभाषणात, पोषण ध्येयाप्रती समर्पित १.३ दशलक्ष अंगणवाडी कार्यकर्त्यांचे आभार मानले. १.२ दशलक्ष अंगणवाडी सहायक आणि राज्य संस्था ८५ दशलक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मात्र शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अंमलबजावणीच्या विज्ञानाची दळणवळणाच्या विज्ञानाशी सांगड घालण्याची वेळ आता आली आहे. जेणेकरुन स्वच्छता आणि स्वच्छ पेयजलासोबत पोषणाचा समावेष राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमात होईल, असे इराणी यांनी सांगितले.

महिला, गर्भवती महिला आणि महिलांमधल्या कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्याची इच्छा बिल गेट्स यांनी व्यक्त केली. ही समस्या सुटल्यास देशाच्या विकासात अभूतपूर्व विकास घडेल, असे ते म्हणाले.

पोषण सुरक्षेसाठी पंचसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी लागेल, असे कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी सांगितले.

ही पंचसूत्री अशी आहे :-

१. महिला, गर्भवती आणि मुलांसाठी उष्मांक संपन्न आहार

२. महिला आणि मुलांमधली प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी डाळींच्या रुपात प्रथिनयुक्त आहाराची सुनिश्चिती

३.आणि जीवनसत्वे, लोह आणि झिंक यासारख्या सूक्ष्म पोषकांचा अभाव भरुन काढणे

४. स्वच्छ पेयजल पुरवठा

५. प्रत्येक गावात विशेषत: १०० दिवसांपेक्षा कमी वयाचे बाळ असलेल्या मातांमध्ये पोषण जागरुकता