ट्रम्प यांची होणार चौकशी [वाचा सविस्तर प्रकरण ]

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



डेमोक्रेटिक पक्षाच्या नैन्सी पेलोसी यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे सभागृहाच्या समितीसमोर ट्रम्प हजर होणार


वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन कॉंग्रेसच्या चौकशी समितीसमोर हजर व्हावे लागणार आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या आणि समितीवर सदस्य असलेलेया नैन्सी पेलोसी यांनी याबाबतचे निमंत्रण 'व्हाईट हाउस'ला पाठवून दिले आहे. सभागृहाच्या महाभियोग समितीकडून डोनाल्ड ट्रम्प यांची चौकशी सुरु आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सभागृहामध्ये पारित करण्यात आला होता.


डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राजकिय प्रतिस्पर्ध्याची चौकशी करण्याकरिता परकीय देशाला प्रोत्साहन दिले, असा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानुषंगाने अनेक साक्षीदारांचे जबाब, उत्तरे समितीने नोंदवली होती. त्यापैकी दोन साक्षीदारांनी सार्वजनिकरित्या वक्तव्ये केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख नेतृत्वाविरोधात गैरव्यवहाराच्या चौकशीची घोषणा करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेन या देशाला फूस लावली , हा ट्रम्प यांच्याविरोधातील मुख्य आरोप आहे. अमेरिकेत येत्या काही दिवसात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय फायद्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून महाभियोग मार्गाचा गैरवापर केला जातो आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी या चौकशी प्रकरणी अनेक ट्विट केले गेले. डेमोक्रेटिक पक्षाचे समितीवरील सदस्य ट्वीटवर आक्षेप घेतात. ट्रम्प यांनी समितीसमोर आपले म्हणणे सादर केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.
@@AUTHORINFO_V1@@